शब्द

                 दसर्‍याला शस्रांची पुजा केली जाते. म्हणतात ना शब्दांची धार तलवारीपेक्षा तीक्ष्ण असते. शस्राने केलेली जखम लवकर भरून येते, पण शब्द खोलवर मनात घाव करतात.               मग या दसर्‍याला शब्दांची पुजा का करू नये ?        दसर्‍याच्या हार्दिक शुभेच्छा. ​

Advertisements

रस्त्यात

 

सरळ चाललेल्या रस्त्यात

अचानक ठेच लागली,

तू समोर आलीस आणि

मनाला तुझीच ओढ लागली.

FB_IMG_1431344482292

रस्ता तर रोजचाच सवयीचा

तू समोरून हसलीस,

सरळ चाललेल्या रस्त्यात

अचानक ठेच लागली.

”परीक्षा”

नेहमीसारखाच तो घरी चालला होता, काहीसा विचारात हरवलेला, कधीही न सुटणाऱ्या कोड्यांची उत्तरे शोधत. प्रश्न तर सोपेच होते पण उत्तरे सापडत नव्हती.

नेहमी आनंदात असतांना, घरातूनही हसत बाहेर पडलेला. पण परततांना इतका उदास, जड अंतकरणाने का चालला होता हेच त्याला समजत नव्हते. बाजारातून आपली सर्व कामे उरकून तो मित्रासोबत बाहेर पडत होता, अचानक समोर आलेली ती व्यक्ती त्याच्या पुन्हा पुन्हा डोळ्यासमोर येत होती. कोण होती ती, जिच्या एक क्षण समोर दिसण्याने मनाच्या गाभाऱ्यात इतकी उलथापालथ झाली होती. निरभ्र आकाशात पाहता पाहता दाटून आलेले काळे कुट्ट ढग आणि विजांचा कडकडाट.

मनाच्या सागरात उठणाऱ्या आठवणींच्या लाटांना तो बांध घालण्याचा अशक्य प्रयत्न पुन्हा करू पाहत होता, पण उंचच उंच उठणाऱ्या लाटांना थांबवण त्याला शक्य नव्हतं. त्याला आठवत होते कॉलेज मधले ते गुलाबी दिवस.

एका अनोळखी चेहऱ्यासाठी वेड झालेलं मन, तासंतास तिची वाट पाहणारे डोळे आजही त्याला धोका देत होते. इतक्या दिवसानीही गर्दीतून तिला शोधून काढणाऱ्या डोळ्यांवर त्याचा विश्वासच बसत नव्हता. कधी तिच्या आठवणीत हरवून जाणारं मन आज तिच्या आठवणीने असं बेचैन का होत होतं.

त्याने वाचली होती ती जगाला वेड लावणारी कविता

‘’प्रेम कर भिल्लाव सारखं
बाणावरती खोचलेलं
मातीमध्ये उगवुन सुध्दा
मेघापर्यंत पोचलेलं.’’

तिच्या नकळत तिच्यावर इतकं जिवापाड प्रेम करणारा तो आज तिला विसरण्याचा प्रयत्न करत होता. असं कोणत कारण होत की त्यासाठी तो तिलाही विसरायला तयार होता, पुन्हा तेच तेच प्रश्न आणि उत्तर मात्र एक, तेही न सापडणारं. तो चालला होता पुढे पण त्याचे मन मात्र त्याला मागे मागे कुठेतरी खोल काळोखात घेऊन चालले होते………………जायची इच्छा तर नव्हती पण समोरचा प्रकाश हि त्याला सहन होत नव्हता.

मंदिरात कधीतरी त्याला एका व्यक्तीने सांगितलेलं वाक्य आठवलं, ‘’ अरे तो तुझी परीक्षा पाहतोय.’’

————————– जगदीश .

कळतच नाही.

प्रेम हे किती विलक्षण आहे, आज ही कळत नाही.
प्रेमात पडलेला माणूस कधी वेडा होतो कळतच नाही.
तुला एक क्षण पाहण्यासाठी मी तासंतास वाट पाहत थांबतो. तुझ्या सहवासात घालवलेला एक एक क्षण मला दिवसासारखा वाटतो. तुझ्याकडे पाहतांना मला जगातील सारी दुख हलकी झाल्यासारखी वाटतात. तुझ्या समोर असण्याने मनाला होणारा आनंद मला कधीच वर्णन करता येणार नाही. कदाचित तुला हे सारे काही खोटं ही वाटत असेल पण प्रेमात पडलेला माणूस कधी वेडा होतो कळतच नाही.
हसता हसता कधी रडू येतं आज ही कळत नाही,
प्रेमात पडलेला माणूस कधी वेडा होतो कळतच नाही.

देव आणि दगड

देव आणि दगड या मधील फरक कुणी सांगू शकेल का ?
मानला तर देव नाहीतर दगड अशी म्हण आपण नेहमीच ऐकतो. पण दगडाला देव मानणारी आपली भारतीय संस्कृती समजणं खरच कठीण आहे. रस्त्याला अनेक दगड पडलेले असतात त्याकडे कोणाचेही लक्ष नसते . पण त्याच दगडाला शेंदूर फासला तर त्यापुढे रांगच लागते .
ते काही असो देव कसलाही असला तरी श्रद्धा महत्वाची आहे . देव दगडाचा असला तरी त्यासमोर उभे राहून हात जोडल्यावर किती शक्ती मिळते, हे मंदिरात गेल्या शिवाय कळत नाही .
image

‘एकांत’

नेहमीचंच झालय ,
असं एकांतात बसनं .
मावळतीचा सुर्य,
एकटक पाहणं .

आठवतोय एकांतात ,
काही क्षण .
मावळतीच्या सुर्यातही
पाहतय तुलाच वेडं मन.

image

‘आवड गाण्यांची’

       “अंखियों के झरोखों से मैंने देखा जो सांवरे
तुम दूर नज़र आये बड़ी दूर नज़र आये
बंद करके झरोखों को ज़रा बैठी जो सोचने
मन में तुम्ही मुस्काए मन में तुम्ही मुस्काए “.
             

image

           माझ्या सर्वाधिक आवडीच्या गाण्यांपैकी हे एक हिंदी गाणं . आज ही हे  गाणं कितीही वेळा ऐकलं तरी कंटाळा वाटत नाही.
        कुणाला गाणी आवडत नाहीत. गाणी ऐकायची आवड असली तरी ऐकायची  सवयच जास्त असते. व्यसनच म्हणाना हव तर. 
               गाणी ऐकल्यावर मन कसं प्रसन्न होतं.  मनावरील ताण कमी करण्याचा एक उत्तम उपाय आहे हा . रोजच्या धकाधकीच्या जीवनात थकलेल्या मनाला ताज करण्यासाठी कामातून थोडा वेळ काढून गाणी ऐकायला विसरू नका. कितीही दु:ख असलं तरी थोडा वेळ शांत एकांतात बसून गाणी ऐकायल्याने दु:ख सहन करण्याची शक्ती आपल्यात येते.
           खरचं संगीतात काय जादु आहे कळत नाही.  रागावर विजय मिळविण्याचा हा एक चांगला मार्ग आहे.   
         एखाद्या शांत ठिकाणी बसून गाणी ऐकण्याची मजा काही औरच आहे. गाणी हिंदी असोत वा मराठी ऐकण्याचा आनंद
हा सारखाच असतो.